पुरुषांमधील वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे.
Category: Health
पुरुषांमधील वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे. ह्या दशकात दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे कि वंध्यत्व हे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये समांतर प्रमाणात आढळते. पुरुषांमधील वंध्यत्वाची तपासणी सोपी आहे आणि खर्चिक देखिल नाही:- सुदैवाने, जीवनशैलीत बदल केल्यास, पुरुष वंध्यत्वावर मात करू शकतात. हे शक्य होऊ शकते. कारण कि, पुरुषांमध्ये शुक्राणूंचे उत्पादन कायम सुरु असते. वंध्यत्वाला कारणीभूत गोष्टींचा त्याग केल्यास व जीवनशैलीत योग्य बदल केल्यास, शुक्राणूंची खालावलेली गुणवत्ता सुधारता येते. तर जीवनशैलीत योग्य बदल काय करावेत? धुम्रपान आणि मध्यपान पूर्णपणे टाळणे अनिवार्य आहे. धुम्रपान केल्याने शुक्राणूंची गुणवत्ता खालावते. ह्यावर केलेल्या संशोधनात निश्चित झाले आहे कि धुम्रपान न करणारांच्या तुलनेत धुम्रपान करणार्यांमध्ये, शुक्राणूंची संख्या २०% ने कमी होती. मध्यपान करणे देखिल वर्ज आहे. त्यामुळे शुक्राणू संथ होतात, प्रमाण कमी होते आणि कमी काळ टिकतात. मध्यपान सोडल्याच्या ३ महिन्यांच्या आतच त्यांची गुणवत्ता पहिल्या प्रमाणे वाढते. लैंगिक संक्रमित संसर्ग टाळणे:- बाळासाठी प्रयत्न चालू असताना लैंगिक संक्रमित संसर्ग टाळणे अनिवार्य आहे. त्या मुळे तुमच्या बाळ होण्याच्या स्वप्नांवर पाणी पडेल हे निश्चित. गरम वातावरण घातक:- शुक्राणूंच्या भोवती गरम वातावरण घातक ठरते. तेव्हां तासंतास लॅपटॉप मांडीवर घेऊन बसू नका. तसेच, अंडकोशाच्या भोवती गरम वातावरण उत्पन्न करणाऱ्या गोष्टी टाळा. आहारातले बदल:- तुमच्या आहारात चरबी युक्त पदार्थ असणे गरजेचे आहे. ह्यामुळे विटामिन a, d, e चे शरीरात शोषण होते. हे विटामिन शुक्राणूंच्या उत्पादनासाठी गरजेचे आहेत. तसेच, रोज सकाळी उन्हात वावर करणे हे महत्वाचे आहे. कारण कि, ते केल्यानेच शरीरात विटामिन D चे उत्पन्न होते, जे शुक्राणूंची गुणवत्ता वाढवायला कार्यक्षम आहे. ताण–तणाव आटोक्यात ठेवा:- ताण-तणावामुळे शुक्राणूंची गुणवत्ता खालावते. त्यावर मार्ग म्हणजे नियमित व्यायाम, योग आणि साधना. झोप:- निवांत व व्यवस्थित ७ – ८ तास झोपणे हे देखिल अनिवार्य आहे. अति व्यायाम टाळणे:- व्यायाम करणे गरजेचे असले तरी, अति व्यायाम केल्याने दुष्परिणाम होतात व हे वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरू शकते. तेव्हां व्यायाम करणे पण बेताचे.
{ More Related Blogs }
Health
Metaslim in pakistan, Lahore, ...
Jan 29, 2016
Health
Best Dermatologist Clinic in M...
Sep 14, 2022
Health
Beemedz The Hottest New Medici...
May 28, 2022
Health
Shop Pakistan...
Oct 8, 2021
Health
Monoatomic gold...
Oct 20, 2015
Health
Best MRI Scan , CT Scan and RT...
Feb 7, 2022